शेतकऱ्यांना खर्च घटणार: चार्जिंग करून चालणार ट्रॅक्टर !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २६ ऑगस्ट २०२३ | देशभर वाढती महागाई आणि त्यात पेट्रोल डीझेलचे दर नियमित वाढ होत असल्यामुळे अनेक सर्वसामान्य लोकांच्या खिशावर आर्थिक ताण येत आहे. याचा फटका कृषी क्षेत्रावर देखील झाला आहे. शेतकऱ्यांना शेती करताना अनेक कृषी उपकरणांची आवश्यकता भासते. या कृषी उपकरणांसाठी डिझेल आणि पेट्रोलची देखील गरज असते. मात्र डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या किमती पाहता शेतकऱ्यांना हे परवडत नाही. शेतकऱ्यांना शेती करताना ट्रॅक्टरची मोठ्या प्रमाणात गरज भासत असते मात्र डिझेलच्या किमती वाढल्या असल्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत.

याच वाढलेल्या किमतीचा विचार करता सध्या बाजारामध्ये वेगवेगळ्या कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च करत आहेत. यामध्ये केवळ शानदार फीचर्स नाहीतर जबरदस्त मायलेज देखील पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा इंधनाचा खर्च वाचतोय तसेच कमी वेळेत शेतीची काम होत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा तीन ट्रॅक्टर बद्दल माहिती सांगणार आहोत जे फक्त दोन तास चार्ज केल्यानंतर आठ तास चालतात. जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती.

paid add

सोनालीका ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. कारण की, याच्या मदतीने फळबागामधील महत्त्वाची कामे करता येतात. सध्या आपल्याकडे फळबाग लागवडीचे क्षेत्र वाढत चालले आहे त्यामुळे त्या दृष्टीने हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा ठरत आहे. पण 25.5 किलो वॅटची नॅचरल कुलिंग बॅटरी दिली असून तो फास्ट चार्जिंग पर्यायामुळे चार तास पूर्ण चार्ज होतो. एकदा तो पूर्ण चार्ज झाल्यानंतर तो जवळपास आठ तास चालतो. या ट्रॅक्टरच्या किमती बद्दल पाहिले तर सहा लाख 40 हजार ते सहा लाख 72 हजार रुपये इतकी या ट्रॅक्टरची किंमत आहे.

एचएव्ही हायब्रीड ट्रॅक्टर हा देशांमधील पहिला हायब्रीड ट्रॅक्टर आहे. यामधील एक खासियत म्हणजे हा ट्रॅक्टर विजेवर, डिझेलवर त्याचबरोबर सीएनजीवर देखील चालतो. या सिरीजचे दोन प्रकारचे मॉडेल असून यातील 50 एस 1 हे मॉडेल डिझेल हायवे आहे तर 50 एस 2 हे मॉडेल सीएनजी ट्रॅक्टर आहे. याच्या किमती बद्दल पाहिले तर या ट्रॅक्टरची किंमत आठ लाख 50 हजार रुपयांपासून पुढे आहे. आऊटोनेक्स्ट ऑटोमेशन या कंपनीने अलीकडेच आपला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च केला असून हा ट्रॅक्टर फक्त दोन तासांमध्ये पूर्ण चार्ज होतो आणि त्यानंतर तो जवळपास शेतामध्ये आठ तास चालतो त्यामुळे जर तुम्हाला नवीन ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम