नाफेड करणार कांदा खरेदी पण टाकणार अटी

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २६ ऑगस्ट २०२३ | गेल्या काही दिवसापासून कांदा प्रश्न देशभर चर्चेत असतांना केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40% शुल्क आकारल्यामुळे सगळीकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सुर उसळला. केंद्र सरकारच्या या निर्णयाला तीव्र स्वरूपाचा विरोध करण्यात येत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय झाल्यानंतर नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर जिल्हाधिकाऱ्यांनी नाफेडच्या माध्यमातून बाजार समितीवर ताबडतोब कांदा खरेदी सुरू करावी असे आदेश देखील काढलेत.

परंतु अजून पर्यंत ही खरेदी सुरू झाली नाही असा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत असून त्यामुळे बाजार समितीमध्ये कांद्याला कमी भाव मिळत आहे. यातच खरेदी सुरू झालेली नसताना मात्र नाफेडणे केंद्रावर खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याच्या बाबतीत अनेक नियम व अटी लावल्यामुळे खरंच नाफेडच्या केंद्रावर कांदा विकला जाणार का असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे.

paid add

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बाजार समिती परिसरामध्ये नाफेडचे खरेदी केंद्र सुरू झाले आहे. या खरेदी केंद्राच्या बाहेर नाफेड च्या माध्यमातून होर्डिंग लावण्यात आलेले असून यासाठी शेतकरी बांधवांकरिता काही सूचना देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने म्हणजे प्रतिहेक्टर 280 क्विंटल पेक्षा जास्त कांदा स्वीकारला जाणार नाही. 45 मिमी च्या पुढचा चांगला कांदा चालेल असे देखील यामध्ये सुचित करण्यात आले आहे.

तसेच कांद्याच्या गुणवत्तेबाबत देखील काही अटी ठेवण्यात आलेल्या असून त्या म्हणजे विळा लागलेला, पती लागलेला व काजळी असलेला, रंग नसलेला, उन्हामुळे कांद्यावर चट्टे पडले असतील तर, कांद्याचा आकार बिघडला असेल, कांद्याला कोंब फुटलेले असतील किंवा तो नरम झालेला असेल, काही बुरशीचा प्रादुर्भाव किंवा त्यामधून वास येत असेल आणि बेले असलेला कांदा स्वीकारला जाणार नाही असे स्पष्टपणे या होर्डिंगवर सूचित करण्यात आलेले आहे. याबाबतीत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले की ज्या अटीपूर्वी होत्या त्याच अटी आज देखील आहेत. दुसऱ्या कुठल्याही नवीन अटी यामध्ये घालण्यात आलेल्या नाहीत. ज्यावेळी कांद्याचे दर पडले त्यावेळी नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून कांद्याची खरेदी करण्यात आली आणि त्यावेळी देखील अशा अटी लावण्यात आलेल्या होत्या व त्याच धर्तीवर आता देखील कांदा खरेदी करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम