कृषी सेवक | ११ एप्रिल २०२४ | राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुसंवर्धन विभागा मार्फत वैरण आणि खाद्य अभियान राबविले जाते. पडीक किंवा गवती कुरणक्षेत्र जमिनीवर पात्र शेतकर्यांना मका बियाण्यासाठी १००% अनुदान दिले जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागा मार्फत यापूर्वी उन्हाळ्यात सन २०२३-२०२४ या वर्षाकरिता वैरण बियाणे वाटप करणे या योजनेसाठी पात्र लाभार्थ्याकडून मे महिन्यात अर्ज मागविले होते. वैरण व पशुखाद्य विकास या सर्वसाधारण योजनेंतर्गत लाभार्थ्यांना १००% अनुदानावर प्रति लाभार्थी १५०० रुपये मर्यादित वैरण बियाणे वाटप केले होते. खरीप हंगामातही वनक्षेत्र नसलेल्या नापीक, गायरान, गवती कुरणक्षेत्र व पडीक जमिनीवर वैरण उत्पादनासाठी शेतकर्यांना आता १००% अनुदान दिले.
पशुधन उत्पादन प्रणालीमध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक सुधारणा सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय पशुधन अभियान सुरू करण्यात आले. जनावरांच्या चारा आणि खाद्य स्त्रोताच्या तुटवड्याचा प्रश्न सोडवण्यासाठी १००% अनुदानावर वैरण बियाणे दिले जाते.
वनक्षेत्र नसलेल्या नापीक, गायरान, गवती कुरणक्षेत्र व पडीक जमिनीवर वैरण घेता येते. शेतकर्याकडे सातबारा, आठ अ असावा. जमीन पडीक, गवती कुरणक्षेत्र असावी. सदर योजनेत प्रति लाभार्थी १५०० रुपये मर्यादित वैरण बियाणे वाटप करण्यात येते. वैरण उत्पादनासाठी १००% अनुदानावर पात्र शेतकर्यांना बियाणे पुरविण्यात येते.
स्थानिक पशु वैद्यकीय दवाखान्यात किंवा पंचायत समिती स्तरावर पात्र शेतकर्यांकडून अर्ज स्वीकारले जातात. तेथून उपलब्ध अनुदानानुसार पशुसंवर्धन विभागाकडे अर्ज पाठविले जातात.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम