विद्युत तारांच्या घर्षणातून आग ; १० क्विंटल कापूस खाक

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २५ नोव्हेंबर २०२२ | शेतात असलेल्या गोठ्याला विद्युत तारांच्या घर्षणातून आग लागल्यानंतर त्या ठिकाणी ठेवलेला दहा क्विंटल कापसासह शेतीचे साहित्य व संसार उपयोगी वस्तू जळून १ लाख रुपयापेक्षा जास्त नुकसान झाल्याची घटना पाथरी तालुक्यातील वाघाळा येथे गुरुवार 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे .

तालुक्यातील वाघाळा येथील शेतकरी मुकेश मोकाशे यांच्या गट क्रमांक 252 मधील मालकीच्या शेतात आखाडा असून या ठिकाणी निवाऱ्यासाठी लाकडी गोठा उभारण्यात आलेला होता. गुरुवार 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास या कोठ्याच्या शेजारील विद्युत पोलवर विद्युत तारांचे घर्षण झाले त्यातून पडलेल्या आगीच्‍या थिलंगीने या गोठ्याने क्षणार्धात पेट घेतला.

दरम्यान या ठिकाणी सदरील शेतकऱ्याने १८ एकर शेता मध्ये निघालेल्या कापसा पैकी सुमारे १० क्विंटल कापूस साठवणूक करून ठेवला होता . तर शेतात लागणारे फवारा व इतर शेती साहित्य यासह कामावरील गड्याचे संसार उपयोगी साहित्य ठेवले होते. हे सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. आग लागल्याचे कळताच शेजारील वंजारवाडी वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांनी या ठिकाणी आग विझवण्यासाठी धाव घेतली होती परंतु आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे आग विझवता आली नाही .लागलेल्या आगी मध्ये या शेतकऱ्याचे तब्बल दीड लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम