शेतकऱ्यांच्या मागण्या १५ दिवसात मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन -रविकांत तुपकर

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २५ नोव्हेंबर २०२२ | सोयाबीन आणि कापूस उत्पदक शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मुंबईत अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता.

 

मात्र काळ मुख्यमंत्र्यांशी बोलणी झाल्यानंतर सध्याचे आंदोलन तुपकर यांनी मागे घेतले असून शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारनं मान्य केल्या आहेत. राज्यस्तरावरील बहुतांशी मागण्या आम्ही तातडीने पूर्णत्वास नेवू तसेच केंद्र शासनासंदर्भात असलेल्या मागण्यांबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू असे आश्वासन राज्य सरकारनं दिल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिली आहे.

शिवाय पुढच्या 15 दिवसात शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसणार असल्याचा इशारा तुपकरांनी दिला आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम