जनावरे वाचविणाऱ्या पशुपालकांना ठरावीक मानधन

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ३ नोव्हेंबर २०२२ | औरंगाबाद जिल्ह्यामध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यात काही पशुपालक मानधनासाठी बाधित झालेल्या जनावरांना मरणाच्या दारात सोडत आहेत. यामुळे जनावरांच्या मृत्यूचा आकड्यात वाढ होताना दिसत आहे. जनावरांचे मृत्यू रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्यातर्फे लम्पी स्कीनबाधित झालेल्या जनावरे वाचविणाऱ्या पशुपालकांना ठरावीक मानधन व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी दिली.जिल्ह्यात गेल्या महिनाभरात लम्पी स्कीन आजाराने थैमान घातलेले असून, आजपर्यंत ३१३ जनावरांचा मृत्यू झालेला आहे. तर, ४ हजार ४५६ जनावरे बाधित झाले असून ३ हजार १५६ जनावरे औषधोचाराने बरे झाले आहेत. आतापर्यंत १४२ जनावरांसाठीचे अनुदान संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. मृत जनावरांसाठी शासनाकडून मदत देण्यात येत आहे. मात्र जी बाधित जनावरे आहेत, त्यांची काळजी घेण्यासाठी कसलीही तरतूद नाही.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम