संत्रा उप्तादक शेतकरी बसला आंदोलनाला !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १७ ऑक्टोबर २०२३

राज्यातील अनेक संकटात शेतकरी अडकलेला असतांना पुन्हा एकदा शेतकरीवर संकट आले आहे. त्यामुळे शेतकरी थेट आंदोलनाला बसला अआहे. दोन देशातील वादाचा फटका विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. आधी बांगलादेशातून येणाऱ्या कांद्यावर भारताने कांद्यावर निर्यात शुल्क वाढवले. त्याला प्रत्युत्तर म्हणून त्याच्या बदल्यात बांगलादेशाने संत्रावर निर्यात शुल्कात प्रचंड मोठी वाढ केली.

paid add

वरुड-मोर्शी तालुका ड्राय झोनमध्ये असला तरी संत्रा उत्पादक शेतकरी जिवाचे रान करत संत्रा फळ बागा वाचवत राहिला. चांगलं उत्पादन निर्माण होवून सुद्धा योग्य बाजार भाव आणि बाजारपेठ नसल्याने आज संत्रा उत्पादक संकटात आला आहे. बांगलादेश देशात मोठी बाजार पेठ संत्रा करीता तयार झाली आहे. मात्र, आयात शुल्क शेकडो पटीने वाढवल्याने व्यापाऱ्यांना बांगलादेशची संत्रा बाजारपेठ परवडत नाही. यामुळे बांगलादेशमध्ये जाणारा लाखो टन संत्रा विदर्भात पडला आहे. संकटात सापडलेल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी आज आंदोलन पुकारले. संत्र्यांचे कॅरेट घेऊन आंदोलक शेतकरी उपविभागीय कार्यालयात दाखल झाले. यावेळी शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देताना घोषणाबाजी केली.

विदर्भातील मुख्य आर्थीक उत्पन्न देणाऱ्या फळपिकांपैकी संत्रा हे एक फळपिक आहे. परंतू, बदलते हवामान आणि दरवर्षी होणारी फळगळती त्यामुळं संत्रा उत्पादक शेतकरी अत्यंत अडचणीचा सामना करत आहेत. त्यातच आता बांग्लादेश सरकारनं संत्रा पिकावर आयात शुल्क वाढवल्याने संत्रा निर्यात जवळपास बंद झाली आहे. विदर्भातील संत्र्याकरीता बांगलादेश हा एकमेव आयात करणारा देश आहे. संत्रानिर्यात झाल्यास स्थानीक बाजारपेठेत शेतकऱ्यांना संत्र्याला बऱ्यापैकी दर मिळतात परंतु आता जवळपास निर्यात बंद झाल्याने स्थानीक बाजारपेठेत सुध्दा संत्र्याचे दर मोठ्या प्रमाणात घटले आहे. हवामानातील बदल दरवर्षी वाढती फळगळ, उत्पादन खर्चात झालेली प्रचंड वाढ त्यामुळे आधीच संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम