गावरान बोरे बाजारात विक्रीसाठी दाखल

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ८ नोव्हेंबर २०२२ | हिवाळ्याच्या सुरुवातीला रानात तसेच शेतातील बांधावर सहज उपलब्ध होणारी गावरान बोरे बाजारात विक्रीसाठी दाखल झाली आहेत. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडते फळ म्हणून परिचित आहे. आठवडे बाजारात विक्रीसाठी बोरे दाखल झाली असून, ग्राहकांची फळ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यानिमित्त बोरे विक्री करणार्‍या महिलांना सहज रोजगार उपलब्ध होतो. खायला चवदार आणि पाहताचक्षणी जिभेला पाणी आणणारी बोरे जीवनसत्वांचे भांडार असतात.

बोरे खाणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. यात असणार्‍या अँटी-ऑक्सीडेंट्समुळे लिव्हर संबंधित समस्या दूर होते, तसेच त्वचा दीर्घकाळ तरुण राहण्यासाठीही बोरे खाणे फायदेशीर ठरते. बोरांमध्ये मोठ्या प्रमाणात ‘क’ आणि ‘अ’ जीवनसत्त्व आणि पोटॅशियम असते. हे घटक रोग प्रतिकारक क्षमतेला बळकट बनवितात. बोरे खाल्ल्याने त्वचा दीर्घकाळ तरुण राहते. यामध्ये अँटी-ऐजिंग तत्त्व असतात आणि यामुळे त्वचा चमकदार, चिरतरुण राखण्यास मदत होते.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम