कृषी सेवक | ८ नोव्हेंबर २०२२ | राहाता बाजार समितीत कांद्याची मोठी आवक झाली. लूज कांद्याला 2124 रुपये भाव मिळाला तर सोयाबीनला 5741 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 1 ला कमीत कमी 1501 तर जास्तीत जास्त 2124 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 951 ते 1500 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 200 ते 950 रुपये भाव मिळाला.
सोयाबीनला कमीत कमी 4655 रुपये, जास्तीत जास्त 5741 रुपये, सरासरी 5650 रुपये. गहू सरासरी 2875 रुपये, हरभरा कमीत कमी 3701 रुपये, जास्तीत जास्त 4660 रुपये, सरासरी 4500 रुपये. मुगाला सरासरी 6400 रुपये, असा भाव मिळाला. डाळिंबाच्या 471 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 131 रुपये ते 165 रुपये, डाळिंब नंबर 2 ला 91 ते 130 रुपये, डाळिंब नंबर 3 ला 46 ते 90 रुपये, डाळिंब नंबर 4 ला 10 ते 45 रुपये भाव मिळाला. अशी माहिती बाजार समितीचे सचीव उध्दव देवकर यांनी दिली.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम