महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज: वादळी पावसाचा यलो अलर्ट जाहीर

बातमी शेअर करा

आज महाराष्ट्रात उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे, कारण बहुतांश राज्यात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात मान्सूनला अनुकूल वातावरण तयार झाले असून, अरबी समुद्राच्या मध्य भागात मान्सून सक्रीय आहे. हवामान विभागाने सांगितले की, आज तळ कोकणासह राज्यातील बहुतेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

धुळे, नंदूरबार, जळगाव, मुंबई आणि पालघर हे जिल्हे वगळता उर्वरित राज्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुढील पाच दिवसांचा पावसाचा अंदाज

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पूर्वमोसमी पावसाने सुरुवात झाली असून, त्यामुळे नागरिक आणि शेतकरी दोघांनाही दिलासा मिळाला आहे. पुढील पाच दिवस राज्यात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यात वाऱ्याचा वेग ३० ते ४० किमी प्रतितास असेल.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम