हरभऱ्याला मिळतोय हमीभावापेक्षा कमी दर

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १८ नोव्हेंबर २०२२ | देशात मागील वर्षभर हरभरा दर दबावात राहिले. मागील हंगामात सरकारने हरभऱ्यासाठी ५ हजार २३० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला होता. मात्र खुल्या बाजारात हरभरा दरानं ही पातळी कधीच गाठली नाही. तर देशातील १३७ लाख टन उत्पादनापैकी सरकारने केवळ २५ लाख टन हरभरा हमीभावाने जाहीर केला. आजही देशात हरभऱ्याला सरासरी ४ हजार ६०० ते ४ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळतोय. म्हणजेच आजही हरभरा दर हमीभावापेक्षा ६०० रुपयांनी कमी आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम