देशात ९ लाख हेक्टरवर हरभरा पेरणी

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १० डिसेंबर २०२२ I देशातील रब्बी पेरणी सध्या जोमात सुरु आहे. मागील वर्षभर देशातील बाजारात हरभऱ्याचा दर दबावात होता.

आजही हरभऱ्याला हमीभावापेक्षा ५०० ते ६०० रुपयांपर्यंत कमी दर मिळत आहे. त्यामुळे यंदा शेतकरी हरभऱ्याचा पेरा कमी करतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्याची प्रचितीही सध्या येत आहे.

मागील १५ दिवसांमध्ये हरभरा पेरणीचा वेग मागीलवर्षीच्या तुलनेत जास्त होता. २ डिसेंबरपर्यंत हरभरा पेरणी मागीलवर्षी याच काळात झालेल्या लागवडीपेक्षा साडेपाच टक्क्यांनी जास्त होती. मात्र केंद्रीय कृषिमंत्रालयाने आज प्रसिध्द केलेल्या आकडेवारीनुसार हरभरा पेरणीचा वेग कमी झाला. गेल्यावर्षीच्या तुलनेत पेरणीची आघाडी आता अडीच टक्क्यांवर आली. गेल्या आठवड्यात हरभरा पेरणी क्षेत्र ८० लाख हेक्टरवर होते, ते आता ८९ लाख हेक्टरवर पोचले. म्हणजेच गेल्या आठवडाभरात देशात केवळ ९ लाख हेक्टरवर हरभरा पेरणी झाली. तर गेल्यावर्षीचं क्षेत्र ८७ लाख हेक्टर होतं.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम