कृषी सेवक I २९ डिसेंबर २०२२ I ऊसतोड मजुरांचा पुरवठा करणाऱ्या काही मुकादमांकडून राज्यातील साखर कारखानदार आणि वाहतूकदारांची फसवणूक सुरू आहे. याप्रकरणी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याणकारी महामंडळाकडून मजूर पुरवठा करण्यासाठी तातडीने बैठक घेऊ. तसेच ज्या मुकादमांनी फसवणूक केली आहे, त्यांची माहिती मुंबई येथे घेण्यात येणाऱ्या बैठकीत द्यावी, त्यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती सहकारमंत्री अतुल सावेयांनी विधानसभेत दिली.विरोधी पक्षनेते अजित पवार, संजय शिंदे यांच्यासह अन्य सदस्यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर अन्य सदस्य आक्रमक होत याप्रकरणी तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी घोषणा केली.
ऊस तोडणी हंगाम सुरू होण्याआधी कारखानदार आणि वाहतूकदार मुकादकांकरवी तोडणी करार करतात. हे मुकादम लाखो रुपये घेतात आणि मजूर पुरवठा करत नाहीत. अनेकदा एका कारखान्यासोबत करार करतात आणि निम्म्यावर तोड ठेवून पुन्हा दुसऱ्या कारखान्याकडे जातात. त्यांना शोधून काढले असता त्यांच्या गावात जाणे मुश्कील होते, असा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम