मारुळ येथे शेतीपिकांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २० नोव्हेंबर २०२२ | यावल तालुक्यातील मारूळ येथील ग्रामपंचायतच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाचे शेती पिकांवरील मार्गदर्शन चर्चासत्र घेण्यात आले यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

सरपंच तथा महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे यावल तालुका उपाध्यक्ष असद जावेद सैय्यद यांच्या अध्यक्षतेखाली “सजीव माती तर समृद्ध शेती” या विषयावर महाराष्ट्र जलमित्र संस्था यांच्या वतीने शेतकरी बांधवांसाठी खूप महत्वपूर्ण चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे आयेशा पठाण, जावेद खान, फिरोज तडवी, संदीप सर या मान्यवरांचे सरपंच व उपस्थिती शेतकरी बांधवांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

paid add

मारुळ व परिसरातील प्रगतशील व प्रयोगशील आदी शेतकरी यांना मोफत पाणी तपासणी माती परीक्षण करणे, क्षारयुक्त पाणी क्षारपड जमीन समस्या व त्यावरील उपाय केळी, ऊस, ज्वारी, अद्रक, टोमँटो, हळद, टरबूज, कांदा, मिरची, कापुस, डाळिंब, भाजीपाला, फुल इ.सर्व पिकावर चर्चा करण्यात आली. दिवसेंदिवस रासायनिक खतांचा, औषधांचा व फवारणीचा खर्च वाढत चाललेला आहे. उत्पादनाची क्षमता मात्र कमीच दिसत आहे. आजकाल क्षारयुक्त पाणी व क्षारपड जमिन त्यामुळे दिवसेंदिवस शेती व पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होत असल्याचे दिसुन येत असल्याचे मार्गदर्शन चर्चासत्रात करण्यात आली.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम