राज्यात उष्णतेचा कहर: विदर्भात उष्णतेची लाट, किनारपट्टीवर यलो अलर्ट, “या” जिल्हयांना मुसळधार पावसाचा अलर्ट
राज्यात सध्या उष्णतेचा कहर असून उन्हाचा चटका वाढला आहे. राज्य मान्सूनची आतुरतेने वाट पहात आहे. विदर्भात उष्णतेच्या लाटांची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर किनारपट्टीच्या भागात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये तापमान उष्ण राहणार असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Rabies पिसाळलेला कुत्रा जनावरांना चावला तर काय होऊ शकते?
विदर्भातील उष्णतेची लाट
नागपूर, वर्धा, आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आहे. भंडारा, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
किनारपट्टीवर उष्ण व दमट हवामान
रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर येथे उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे.
मान्सून अपडेट: लवकरच महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता
पावसाचा अंदाज
भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील नांदेड, धाराशिव, लातूर, बीड, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सिंधूदुर्ग जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम