नुकसान भरपाईच्या रकमेत मोठी वाढ

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १६ डिसेंबर २०२२ I अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या शेतकऱ्यांना आता शिंदे-फडणवीस सरकारने दिलासा दिला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेत प्रति हेक्टर दुपटीने वाढ करण्यात आली आहे. महसूल व वन विभागाने हा निर्णय जाहीर केला आहे.

राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून पीके आणि शेतजमिनीच्या नुकसानीसाठी 222 कोटी 32 लाख 45 हजार रुपये इतका निधी वितरीत करण्यास सरकारने मंजूरी दिली आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम