डाळींच्या आयातदारांना केंद्र सरकारचे पाठबळ

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १६ डिसेंबर २०२२ I भारतीय शेतकऱ्यांना डाळींचे अधिकाधिकउत्पादन करता यावे यासाठी मदत म्हणून आवश्यक ती सर्व पावले ग्राहक व्यवहार विभाग उचलणार आहे. सोबतच डाळींच्या निर्बाध आयातीसाठी आयातदारांनाही सहाय्य केले जाईल, जेणेकरुन 2023 मध्ये ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत डाळी उपलब्ध होतील, असे ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह, यांनी आज नवी दिल्ली येथे डाळी संघटनांसोबत झालेल्या बैठकीत सांगितले.
येत्या काही वर्षांत जागतिक स्तरावर डाळींची उपलब्धता वाढेल कारण म्यानमारमधून उत्पादनात वाढ अपेक्षित असून, ते येण्यास सुरुवात झाली आहे. तसेच आफ्रिकन देशांमध्येही पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम