फळबागांमध्ये तणाच्या वाढत्या प्रादुर्भावावर गवत तलवारीचा करा उपाय

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ३० ऑक्टोबर २०२२ | मनुष्यबळ उपलब्ध न झाल्यास आपणच फळबागांमध्ये तणाच्या वाढत्या प्रादुर्भावावर गवत तलवारीने उपाय केल्यास फळबागांना आणखी पोषक वातावरण मिळेल. गवतामुळे बागेमध्ये आर्द्रता सतत टिकून राहते. बागेतील सततच्या आर्द्रतेमुळे संत्रा बागेत कोलेटोट्रिकम ग्लास्पोरिऑइड्स या बुरशीचा प्रादुर्भाव होतो. या बुरशीमुळे संत्रा फळे परिपक्व होण्यापूर्वीच गळून पडतात. गळलेली फळे ही पिवळ्या रंगाची व अधिक आंबट असतात. मुख्य पिकांना अन्न, पाणी, सूर्यप्रकाश इ. वाढीसाठी आवश्यक घटकांची कमतरता भासते. पिकांचे पोषण अपुरे होऊन त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.. ही तणे अनेक रोग किडींची यजमान पिके असतात. या तणांवरील रोग-किडींचा फटका मुख्य पिकालाही बसतो. गवत तलवार या अवजाराने बागेतील तण अतिशय सोप्या पद्धतीने काढता येते. गवत तलवार स्वस्त असून, ३०० ते ३५० रुपयांपर्यंत मिळते. त्यामुळे दिड ते दोन तासातच एक एकरावरिल तणाची वेगाने छाटणी करता येते. बागेतील गवताचे प्रमाण एकदम कमी होते.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम