बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या,कुत्रा आणि पाच कोंबड्या ठार

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ३० ऑक्टोबर २०२२ | राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे बिबटयाने केलेल्या हल्ल्यात  दोन शेळ्या,पाळीव कुत्रा व पाच कोंबड्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांंमध्ये भीतीचे वातावरण असून, वनविभागाने बिबटयाचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

पिंपरी निर्मळ येथील लांभळीच्या मळा या वस्तीवरील दिलीप भाऊसाहेब घोरपडे यांच्या गोठयामध्ये त्यांच्या दाेन शेळया होत्या. शुक्रवारी रात्री अंधाराचा फायदा घेत बिबटयाने रात्री अडीचच्या सुमारास गोठयात केलेल्या हल्ल्यात दाेन शेळया, पाळीव कुत्रा व पाच कोबंडयांचा मृत्यु झाला. यामुळे घोरपडे यांचे जवळपास तीस हजारांचे नुकसान झाले आहे.

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांंनी घटनास्थळी भेट देऊन गोठयातील दोनही शेळयांचा पंचनामा केला.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम