जैविक खत द्याल तर जमिनीचे होईल सोने; पीक येईल मोत्यांसारखे

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २० मे २०२४ | रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडला आहे आणि उत्पादनात घट होत आहे. शेतजमिनीतून उत्तम पीक घ्यायचे असेल, तर सुपीकता आवश्यक आहे.

रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत खराब झाला आहे, त्यामुळे उत्पादन कमी येते. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी जैविक खते उपयुक्त आहेत, असे कृषी तज्ज्ञ सांगतात.

राज्यात आज कांद्याचे बाजारभाव काय आहेत? कुठल्या बाजारसमितीत कांद्याचे दर कमी झाले

जमिनीच्या सुपीकतेसाठी आवश्यक नैसर्गिक अन्नघटक पिकांना नैसर्गिकरीत्या मिळतात. शेतजमिनीच्या एका ग्रॅम मातीत २ कोटी ४० लाखांपेक्षा जास्त जीवाणू आणि १३० प्रकारचे जीवाणू असतात. ज्यांची जमिनीचा सामू ६.५ आणि सेंद्रिय कर्बाची पातळी ०.८ पेक्षा जास्त असते, ती शेती सुपीक मानली जाते.

मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांना द्यावी लागतात. पिकांना आवश्यक अन्नघटक जमिनीत उपलब्ध करून देण्याचे काम जीवाणू करतात. या जीवाणूंची संख्या आणि कार्यक्षमता अत्यंत महत्त्वाची असते.

नत्र स्थिर करणाऱ्या सहजीवी जैविक गटात रायझोबियम, तर असहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणाऱ्या गटात अझेटोबॅक्टर, अझोस्पिरिलम, असिटोबॅक्टर यांचा समावेश होतो. याशिवाय अन्य प्रकारची खतेही आहेत.

कोणती आहेत जैविक खते?
– पिकांची वाढ वाढविण्यासाठी जैविक कर्ब द्यावा लागतो. जैविक कर्ब सेंद्रिय खतातून मिळतो. जीवामृत, वेस्ट डी कंपोझर, ह्यमिक, अॅझो, रायझो, पीएसबी, केएसबी अशी जैविक खते व हिरवळीची खते कमी खर्चात पिकाला देता येतात.
– जैविक खते किंवा जीवाणूमुळेच शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळू शकते. जमिनीत जीवाणू नसतील, तर कितीही रासायनिक खते दिली तरी उत्पन्न कमी मिळते.

कृत्रिमरीत्या फळे पिकवू नका, अन्यथा कारवाई, एफएसएसएआयचा विक्रेते, व्यापाऱ्यांना इशारा

सूक्ष्म अन्नद्रव्ये
सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये फेरस लोह, झिंक, कॉपर, मॅंगनीज, मोलिब्डेनम, बोरॉन, निकेल यांचा समावेश होतो. सूक्ष्म अन्नद्रव्ये मुख्य आणि दुय्यम अन्नद्रव्यांच्या मानाने कमी प्रमाणात आवश्यक असतात.

मुख्य अन्नद्रव्ये
मुख्य अन्नद्रव्यांमध्ये नत्र, स्फुरद, पालाश यांचा समावेश होतो. ही अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात पुरवावी लागतात.

दुय्यम अन्नद्रव्ये
दुय्यम अन्नद्रव्यांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक यांचा समावेश होतो. ही अन्नद्रव्ये मुख्य अन्नद्रव्यांच्या मानाने कमी प्रमाणात पुरवावी लागतात.

नैसर्गिक अन्नघटक
नैसर्गिक अन्नघटकांमध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन (प्राणवायू) यांचा समावेश होतो. हे घटक नैसर्गिकरीत्या हवा, पाणी, सूर्यप्रकाश यांपासून मिळतात.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम