कृषी सेवक | २० मे २०२४ | आज सकाळच्या सत्रात राज्यात ४३३५ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. जळगावात बोल्ड जातीच्या हरभऱ्याला सर्वाधिक दर मिळत आहेत. विविध बाजार समित्यांमध्ये लाल, गरडा, काट्या, काबुली चणा आणि लोकल हरभऱ्याची आवक झाली आहे. अमरावती बाजार समितीत सर्वाधिक लोकल हरभऱ्याची आवक झाली असून, दुपारी २ वाजेपर्यंत ३१३२ क्विंटल हरभऱ्याची नोंद झाली.
राज्यात आज कांद्याचे बाजारभाव काय आहेत? कुठल्या बाजारसमितीत कांद्याचे दर कमी झाले
जळगावात बोल्ड जातीच्या हरभऱ्याला क्विंटलमागे ९५५० रुपये दर मिळाला आहे. काबुली चण्याला ७८०० रुपये दर मिळाला आहे. धाराशिवमध्ये काट्या, गरडा आणि लाल हरभऱ्याला ५६०० ते ६०९६ रुपये दर मिळाला आहे. पुण्यात हरभऱ्याला ७००० रुपये दर मिळाला आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम