राज्यात आज कांद्याचे बाजारभाव काय आहेत? कुठल्या बाजारसमितीत कांद्याचे दर कमी झाले

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २० मे २०२४ | आज, २० मे रोजी, नाशिक जिल्ह्यातील बाजारसमित्या मतदानामुळे बंद आहेत. मात्र, राज्यातील इतर ठिकाणी कांद्याचे लिलाव झाले आहेत. आजचे कांदा बाजारभाव काय आहेत, ते जाणून घेऊया.

“या” बाजारसमितीत काबुली चण्याला मिळतोय सर्वाधिक भाव, कुठे किती झाली आवक जाणून घ्या…

उत्तर महाराष्ट्रात आज लोकसभा मतदानाच्या पाचव्या टप्प्याचे मतदान सुरू आहे. दिंडोरी, नाशिक आणि धुळे या मतदारसंघांमध्ये मतदान असल्यामुळे लासलगाव, पिंपळगाव, तसेच नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील प्रमुख कांदा बाजारसमित्या आज बंद आहेत. मात्र पुणे, सांगली आणि कराड बाजारसमित्यांमध्ये सकाळी कांद्याची नियमित उलाढाल झाली.

पुणे बाजारसमितीत आज सकाळच्या सत्रात ११,४९३ क्विंटल स्थानिक कांद्याची आवक झाली. येथे कमीत कमी बाजारभाव ६०० रुपये प्रति क्विंटल, तर सरासरी बाजारभाव १,३०० रुपये प्रति क्विंटल होते.

ई-केवायसी न केल्यामुळे ९४,००० शेतकरी पीएम किसान सन्मान निधीपासून वंचित

कराड बाजारसमितीत हळव्या कांद्याला सरासरी २,००० रुपये प्रति क्विंटल, तर पेण बाजारसमितीत लाल कांद्याला सरासरी २,४०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. या ठिकाणी नगण्य कांद्याची आवक होती.

आज सकाळच्या सत्रातील कांद्याचे बाजारभाव.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम