कांदा उप्तादक शेतकरी आनंदात : भावात झाली मोठी वाढ !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १ नोव्हेबर २०२३

गेल्या काही महिन्या अगोदर टोमाटोचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते पण त्यानंतर अचानक दर उतरल्याने अनेक शेतकऱ्यांना फटका बसला पण सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे चांगले दिवस आले आहेत. बाजारात कांद्याची आवक कमी झाल्याने कांद्याचे दर तेजीत आहेत. दिल्लीमध्ये कांद्याचे दर 60 ते 70 रुपये प्रतिकिलो असून लवकरच ते शंभरी गाठतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मागील आठवड्यापासून बाजारात कांद्याची आवक कमक झाल्याने कांद्याच्या दरात विक्रमी वाढ झाल्याचे भाजीविक्रेते सांगत आहेत.

नवरात्रीच्या अगोदर कांद्याचा 50 रुपये प्रतिकिलोवर असणारा दर आत 70 रुपये प्रतिकिलोवर गेला आहे. बाजारामध्ये कांदा 70 रुपये किलो दराने मिळाला तर आम्ही तो 80 रुपये किलो दराने विक्री करू, असे भाजीविक्रेत्यांचे म्हणणे आहे. याआधी कांद्याचा दर फक्त 30 ते 40 प्रतिकिलो इतकाच होता. मात्र आता कांद्याचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होणार आहे.

भाजीमार्केटचा विचार केल्यास भाजीपाल्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. तसेच टोमॅटोचे दर सुद्धा वाढले आहेत. याआधी टोमॅटोचे दर 20 रुपये प्रतिकिलो इतके होते. मात्र आता ते ४०-४५ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. कांद्याप्रमाणेच टोमॅटोचेही दर 70 रुपये प्रतिकिलोपर्यंत उडी मारतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम