कांद्याच्या भावात सुधारणा

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २६ नोव्हेंबर २०२२ | मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये लाल कांद्याची आवक होऊ लागली आहे. शुक्रवारी (दि.२४) तीन ट्रॅक्टर इतकी आवक होऊन सुरुवातीलाच लाल कांद्याला १,७००: २,००० व सरासरी १,७०० रुपये क्विंटल भाव मिळाला. उन्हाळ कांद्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून सातत्याने गडगडत असले, तरी शुक्रवारी या भावात काही अंशी सुधारणा दिसून आली. बाजार आवारात आज २२९ ट्रॅक्टर इतकी आवक होऊन ३०० ते १,५९६ व सरासरी १,१०० रुपये क्विंटल असे भाव होते. मक्याची २०३ नग इतकी आवक झाली. १,९०० ते २,०६३ व सरासरी १,९९९ रुपये क्विंटल असे भाव राहिले. बाजारात नवीन लाल कांदा विक्रीस सुरुवात झाली आहे, पण सुरुवातीलाच भाव कमी निघाले. अवकाळी पावसामुळे सुरुवातीचे लाल कांदे खराब झाल्याने चालू वर्षी लाल कांद्याचे उत्पादन काहीसे घटले आहे. त्यामुळे अजून लाल कांदा विक्रीस कमी प्रमाणात येत आहे. काही शेतकऱ्यांचे लाल कांदे काढणीस आले सध्या शेतकऱ्यांकडे कांदा अल्प प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र बहुतांश कांदा कमी भावात विकावा लागत असल्याने हे शेतकरी टप्प्याटप्प्याने माल बाजारात आणताना दिसत आहेत.

त्याचे प्रमाणही कमी आहे. सध्या बाजारात कांद्याची आवक कमी असल्याने दरात सुधारणा होत आहे.यासोबतच पावसाने लाल कांदा लागवडीचेही नुकसान केले. रोपवाटिकेचे नुकसान झाले.दरात सुधारणा होत असली तरी अजूनही वाढ होण्याची प्रतीक्षा असून हा दर देखील परवडणारा नसल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत, यामुळे बाजारात आवक स्थिर आहेत.सप्ताहात गव्हाच्या आवकेत घट झाली,भाव स्थिर राहिले

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम