कृषी सेवक | १९ ऑक्टोबर २०२२ |मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला बसला आहे. जुलै महिन्यात नांदेड जिल्ह्यात मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाली. ज्यात सुमारे ७ लाख ४१हजार ९४६ शेतकऱ्याचे ५ लाख २७ हजार ४९१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून अहवाल संबंधित विभागाकडे पाठवला होता. त्यानंतर आता अखेर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने नांदेड जिल्ह्यासाठी ७१७ कोटी ८८ लक्ष रुपयांचा निधी वितरीत केला आहे. त्यामुळे प्राप्त निधी नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रीया वेगात सुरु असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली.
ज्या शेतकऱ्यांचे 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेले आहे अशा सर्व शेतकऱ्यांसाठी निधी प्राप्त झाला आहे. निधीचे वाटप तालुकास्तरावर झालेले आहे. संबंधीत शेतकऱ्यांच्या खात्यावर बँकेमार्फत ही नुकसान भरपाई रक्कम जमा करण्याची प्रक्रीया सुरु असल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्याला यापूर्वीच ८ सप्टेंबर२०२२ च्या शासन निर्णयानुसार इतराच्या अगोदर निधी मिळाला होता.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम