शेवगाव तालुक्यात कपाशी पिकांचे नुकसान

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १९ ऑक्टोबर २०२२ |पावसामुळे नुकसान झालेल्या तालुक्यातील खरीप पिके व फळबागांना नुकसान भरपाईसाठी अदयाप पंचनाम्याचीच प्रतिक्षा आहे. त्यामुळे शेतक-यांना झालेल्या नुकसानीची भरपाई कधी मिळेल याबाबत साशंकता आहे. जवळपास ६० हजार हेक्टरवरील खरीप पिके १२०० हेक्टर फळबागा व इतर पिकांखालील क्षेत्राचा व पावसामुळे झालेल्या नुकसानीचा विचार करता पंचनामे म्हणजे केवळ नादी लावण्याचा फार्स ठरू नये अशी भिती शेतक-यांमधून व्यक्त होत आहे.

तालुक्यात खरीपाचे क्षेत्र मोठे असून त्यामध्ये सर्वाधिक ४२५४२ हेक्टर क्षेत्रावर यंदा कपाशीची लागवड झाली आहे. त्या खालोखाल तुर – ७८३८, बाजरी-१९६८, कांदा-१७२, मुग-७१३, उडीद – ८१०, सोयाबीन- ९२१ असा ५९९६४ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरा झालेला आहे. तर १२०० हेक्टर फळबागा व ऊस १६ हजार ५३२ हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली आहे. हंगामाच्या सुरुवातीला वरदान ठरलेला पाऊस आता मात्र शेतक-यांच्या मुळावर उठला आहे

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम