विचित्र हवामानामुळे जगात जाणवतेय अन्नधान्याची टंचाई

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ३० ऑक्टोबर २०२२ | जगात २०२२ साली हवामान बदलामुळे जगात अन्नधान्याची टंचाई निर्माण झाल्याचे जाणकारांकडून व्यक्त होत आहे .

दोन वर्षांपूर्वीपर्यंत जगाचं शेतीचं चित्र वेगळं होतं. अन्नधान्याची गोदामी काठोकाठ भरून वाहत होती. त्यामुळे जगात २०२२ मध्ये अन्नधान्यांची टंचाई होईल, असं भाकित कोणी करणं शक्य नव्हतं. शेतीमालाच्या पुरवठ्याची बाजू भक्कम असून एखाद्या देशात तुटवडा पडला तरी दुसऱ्या देशातून आयात करून तो खड्डा भरून काढता येईल असा विश्वास व्यक्त केला जात होता. मात्र हा विश्वास किती पोकळ होता, हे या वर्षी दिसून आलं.

एकाच वेळी सर्व देशांमध्ये अन्नधान्य उत्पादन घटल्यामुळे यंदा शेतीमालाची पुरवठा साखळी पुरती विस्कटून गेली. या वर्षी ज्या पद्धतीनं विविध देशांमध्ये अन्नधान्याचं उत्पादन कमी झालं, दर वाढले आणि त्यानंतर प्रमुख उत्पादक देशांनी महागाई कमी करण्यासाठी निर्यातीवर निर्बंध घातले, ते अनेक बाबतींत विस्मयकारक होतं. अशाच विचित्र हवामानाची आगामी दोन वर्षांमध्ये निर्माण झाल्यास जगातील अनेक देशांची स्थिती चिंताजनक होईल. लोकसंख्येच्या बाबतीत चीनची स्पर्धा करणाऱ्या भारताची अवस्था बिकट होईल.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम