नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ३० ऑक्टोबर २०२२ | सततच्या नापिकीमुळे होत असलेल्या आर्थिक नुकसानीला कंटाळून विष प्राशन करीत शेतकऱ्याने आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार, २८ रोजी जळगाव तालुक्यातील सालबर्डी येथे घडली. ललित संजय झोपे (३१, सालबर्डी) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे.

ललित झोपे या शेतकर्‍यावर सततच्या नापिकीसह आर्थिक् संकट कोसळले होते. याला कंटाळून शेतात विषारी द्रव्य प्राशन केल्याची घटना गुरुवार, २७ ऑक्टोंबर रोजी सकाळी उघडकीस आली होती. अत्यवस्थ अवस्थेत त्यांना पुढील उपचारार्थ जळगाव सिव्हील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र शुक्रवारी मध्यरात्री 3.25 वाजता त्यांची प्राणज्येात मालवली. मयत शेतकर्‍याच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुले असा परीवार आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम