“या” बाजारसमितीत काबुली चण्याला मिळतोय सर्वाधिक भाव, कुठे किती झाली आवक जाणून घ्या…

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १९ मे २०२४ | राज्यात आज हरभऱ्याची आवक काहीशी मंदावली असून दुपारी ४.३० वाजेपर्यंत २९८ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली होती. यावेळी लोकल जातीच्या हरभऱ्यासह लाल, काबुली, हायब्रीड हरभरा विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल झाला होता.

कृत्रिमरीत्या फळे पिकवू नका, अन्यथा कारवाई, एफएसएसएआयचा विक्रेते, व्यापाऱ्यांना इशारा

आज बुलढाणा येथे काबुली चण्याला ९००० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळाला. छत्रपती संभाजीनगर येथे हरभऱ्याला ६००० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळाला. बुलढाण्यात आज काबुली चण्यासह हायब्रीड आणि लाल हरभऱ्याचीही आवक झाली होती. यावेळी सर्वाधिक भाव काबुली चण्याला मिळाला. उर्वरित बाजारपेठांमध्ये हरभऱ्याला ४३०० ते ९००० रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याचे चित्र आहे.

कोणत्या बाजारसमितीत हरभऱ्याला काय भाव मिळतोय? जाणून घ्या…

ई-केवायसी न केल्यामुळे ९४,००० शेतकरी पीएम किसान सन्मान निधीपासून वंचित

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम