मोसमी पावसाचा प्रवास कसा असेल? हवामान विभागाची माहिती…

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २० मे २०२४ | भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रविवारी (दि. १९) नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सून निकोबार बेटांवर पोहोचला. मान्सूनने रविवारी मालदीवचा काही भाग, बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग, निकोबार द्वीपसमूह आणि दक्षिण अंदमान समुद्राचा काही भाग गाठला असल्याची माहिती विभागाने दिली. सध्याचे अनुकूल हवामान पाहता, ३१ मेपर्यंत मान्सून केरळमध्ये आणि ६ ते १० जूनदरम्यान महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता आहे.

ई-केवायसी न केल्यामुळे ९४,००० शेतकरी पीएम किसान सन्मान निधीपासून वंचित

‘ला नीना’च्या अनुकूल परिस्थितीमुळे यावर्षी देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. गेल्या वर्षी ‘अल निनो’ सक्रिय होता, परंतु यावर्षी तो कमी होतो आहे. त्यामुळे तीन ते पाच आठवड्यांत ‘ला निना’ची स्थिती निर्माण होईल असा अंदाज आहे. केरळमध्ये ३१ मे रोजी, तसेच दक्षिण कोकणात ५ जून रोजी मान्सून दाखल होईल, आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात १५ जूनपूर्वी पोहोचेल.

७०० रुपये प्रति क्विंटलवर आलेले केळीचे दर आता पुन्हा वाढले; वाचा काय मिळतोय सध्या दर

उत्तर भारतात उष्णतेची लाट

सध्या देशातील अनेक राज्यांत कमाल तापमान उच्चांक गाठत आहे. काही ठिकाणी तापमान ४८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंडीगड आणि राजस्थानच्या काही भागांत पुढील चार दिवसांसाठी उष्णतेच्या तीव्र लाटेचा रेड अलर्ट जारी केला आहे. याशिवाय गुजरात, पूर्व राजस्थान, उत्तर प्रदेश, आणि बिहारच्या काही भागांतही कमाल तापमान वाढण्याचा अंदाज आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम