दै. बातमीदार । १२ मे २०२४ । ऊस पिकात ‘ब्लॅक बग’ म्हणजेच काळ्या किडीचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. या किडीचा प्रादुर्भाव साधारणतः एप्रिल ते जून या महिन्यात होतो. ऊस लागवड करणाऱ्या शेतकर्यांनी त्यांच्या ऊस पिकाची विशेष काळजी घेणे अगदी आवश्यक आहे.
सध्याच्या वातावरणात उसामध्ये ‘ब्लॅक बग’ या किडीचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते, ज्याला काळे बग असे देखील म्हणतात. यामुळे उसाचे पीक उद्ध्वस्त होऊ शकते. काळे बग या उसामध्ये आढळणाऱ्या किडीचे वेळीच नियंत्रण न केल्यास शेतकऱ्याच्या संपूर्ण पिकाचा नाश होऊ शकतो.
शेतकरी पुन्हा संकटात; सोयाबीन बियाणे किमतीत मोठी वाढ !
काळे किडे ऊस पिकाची पाने आणि देठातील रस शोषून थेट नुकसान करतात. सदर रोगामुळे उसाचे पाने कोमेजतात, झाडाची वाढ कमी होते आणि उसाचे उत्पादन कमी होते.तसेच, काळे बग उसाच्या पिवळ्या पानांचे विषाणू आणि इतर रोगजनकांचा प्रसार करू शकतात, ज्यामुळे पिकाचे होणारे नुकसान वाढते.
उसाची, शेंगा, तृणधान्ये किंवा भाजीपाला यासारख्या पिकासोबत पीक फेरपालट करावी यामुळे या किडीचा प्रादुर्भावास प्रतिबंध होतो. उसाची वेळेवर लागवड, प्रतिरोधक वाणांसोबत आंतरपीक घेणे, नियमितपणे तण काढणे आणि योग्य माती व्यवस्थापन यासारख्या उपायांमुळे सुद्धा उसामध्ये काळ्या किडींचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यास मदत होऊ शकते.
कापूस बियाणे खरेदी करताना सावध – कृषी विभागाचा शेतकऱ्यांना इशारा !
उसावरील ब्लॅक बगचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमितपणे पिकांचे निरीक्षण करून सुरुवातीच्या काळातच काळ्या बगचा प्रादुर्भाव शोधणे महत्त्वाचे आहे. यामुळे वेळेवर नियंत्रण उपाय करून होणारे जास्तीचे नुकसान टाळता येते.
- शेतातील ब्लॅक बगच्या संख्येवर लक्ष ठेवण्यासाठी पिवळे चिकट सापळे किंवा स्वीप नेट वापरावे.
- या किडीच्या प्रतिबंधासाठी व्हर्टिसिलियम लॅकनी १.१५ % डब्ल्यू. पी. ते ४००-५०० लिटर पाण्यात २.५ किलो प्रति हेक्टर या प्रमाणात मिसळून आवश्यकतेनुसार १५ दिवसांच्या अंतराने सायंकाळी फवारणी करावी.
- भुंगे, ढेकूण आणि कोळी यासारखे कीटक ब्लॅक बगला खाऊन त्यांचे नियंत्रण करण्यास मदत करतात.
- क्लोरपायरीफॉस २०% EC १.५ लिटर @ ८०० ते १००० लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी.
- फिप्रोनिल (५% ईसी) @३०० मिली/एकर, बायफेन्थ्रीन (१०% ईसी) @ २५० मिली/एकर किंवा लॅम्बडा-सायहॅलोथ्रिन (२.५% ईसी) @ २०० मिली/एकर फवारणी करावी.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम