कृषी सेवक | १८ मे २०२४ | राज्यात पुढील चार दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. विशेषतः आज (ता.१८) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे. कोकणात हवामान दमट राहील, असेही हवामान विभागाने सांगितले आहे.
अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती
अरबी समुद्रात येमेनच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून साडेचार किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच मध्य प्रदेश आणि परिसरावर ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती दिसत आहे. परिणामी, राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान निर्माण झाले आहे. त्यामुळे दुपारपर्यंत उन्हाचा ताप तर सायंकाळच्या सुमारास पावसाचे वातावरण दिसून येत आहे.
ऊस पिकात झपाट्याने वाढतोय ‘ब्लॅक बगचा’ प्रादुर्भाव; करा “हे” एकात्मिक नियंत्रण उपाय!
मॉन्सूनपूर्व पावसाचा तडाखा सुरूच
गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यात मॉन्सूनपूर्व पावसाचा तडाखा सुरू आहे. राज्यात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शुक्रवारी (ता.१७) वादळी पावसाचा फटका बसला. परभणीमध्ये रिमझिम पाऊस पडला, तर नागपूर, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, नांदेड येथे ढगाळ हवामान होते. नगर, सोलापूर, पुणे येथे कडक ऊन होते. छत्रपती संभाजीनगर येथे ऊन-सावलीचा खेळ सुरू होता, तर नाशिक जिल्ह्यात दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस पडला.
शेतकरी पुन्हा संकटात; सोयाबीन बियाणे किमतीत मोठी वाढ !
कमाल तापमानात चढ-उतार
मागील २४ तासांमध्ये जळगाव येथे उच्चांकी ४२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तापमान ४० अंशांच्या वर आहे. ढगाळ हवामानामुळे उन्हाचा चटका कमी झाला असून, कमाल तापमानात चढ-उतार होत आहेत. सध्या जळगाव ४२.८, अकोला ४२.४, अमरावती ४०.८, ब्रह्मपुरी ४१.२, वर्धा ४०, वाशीम ४१.२, यवतमाळ ४० या जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंशांहून अधिक आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम