कृषी सेवक | १३ नोव्हेंबर २०२२ | लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक औरंगाबाद, जालना, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांतील उमरगा बाजार समितीत होणाऱ्या आवकेच्या तुलनेत गत आठवडाभरात जास्तच झाली. शिवाय दरही ( इतर बाजार समित्यांच्या तुलनेत थोडे चढेच राहिल्याची स्थिती आहे.लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ५ ते ११ नोव्हेंबरदरम्यान सोयाबीनची एकूण आवक १ लाख ३ हजार ३६६ क्विंटल झाली. या सोयाबीनचे किमान दर ४९५२ ते ५६०१ रुपये प्रति क्विंटल दरम्यान, तर कमाल दर ५८११ ते ६३५१ रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहिले. सोयाबीनला सरासरी दर ५५०० ते ५९८० रुपये प्रति क्विंटल दरम्यान मिळाला. सोयाबीनची आवक १३३१९ ते १९४५८ क्विंटल दरम्यान राहिली.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम