शेतकऱ्यांनी फळबाग व फुलशेतीकडे वळावे -आ. किसन कथोरे

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १३ नोव्हेंबर २०२२ | शेतकऱ्यांनी भात शेतीवर विसंबून न राहता फळबाग व फुलशेतीकडे वळणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आमदार किसन कथोरे यांनी अंबरनाथ येथे केले. राष्ट्रीय अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान व भात क्षेत्रामध्ये कडधान्य योजनेअंतर्गत पीक प्रात्यक्षिक योजनेत आमदार कथोरे यांच्या हस्ते आंबेशिवला हरभरा, मसूर व मोहरी बियाणे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. या वेळी त्यांनी हे आवाहन केले.पिके घेण्याबरोबरच मोगरा, फणस, शेवगा यांची लागवड यावर भर देऊन शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय करण्याकडे भर द्यावा, तसेच शेतकऱ्यांनी आंबा पीक विमा काढून नैसर्गिक आपत्तीपासून विमा संरक्षण करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

भात पीक काढणी अंतिम टप्प्यात असून रब्बी हंगाम पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना अनुदानित हरभरा, मसूर, मोहरी बियाणे वाटप करण्यात येत असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा उद्देश असल्याचे या वेळी सांगण्यात आले.महत्त्‍वाकांक्षी किसान क्रेडिट कार्ड योजनेतील कार्डवाटपाची सुरुवात आमदार कथोरे यांच्या हस्ते करण्यात आली.

उल्हासनगर तालुका कृषी अधिकारी विठ्ठल बांबळे यांनी किसान क्रेडिट कार्डबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे यांनी हरभरा लागवड, हरभरा शेंडे खुडणे, खत व पाणी व्यवस्थापन करून हरभरा पिकाच्‍या उत्पादनाबाबत मार्गदर्शन केले. सरकारमार्फत शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेल्या हरभरा, मसूर बियाणे उत्पादनवाढीसाठी उपयोग करून घ्यावा व उत्पन्नात वाढ करून घेण्याचे आवाहन आमदार किसन कथोरे यांनी केले.

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम