बाजरी व ज्वारीच्या दरात वाढ

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १९ नोव्हेंबर २०२२ |मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक बाजारात बाजरी व ज्वारीच्या दरातवाढ झाली आहे. बाजरीच्या दरात गतवर्षीच्या तुलनेत आठ रुपयांनी तर ज्वारीचे दर प्रतिकिलो सहा रुपयांनी वाढले आहेत. सध्या गव्हाचे दर स्थिर आहेत. तांदळाचे दरही एक-दोन रुपयांनी वाढले आहेत. ज्वारी, बाजरीच्या दरात वाढ झाल्यामुळे भाकरी आता महागली आहे.गतवर्षी बाजरीचे दर प्रतिकिलो २२ रुपये होते, मात्र यंदा दरात आठ ते १० रुपयांची वाढ झाली असून दर्जानुसार ३० रुपये किलोने विकली जात आहे. सध्या बाजरीची आवक कमी असल्यामुळे दरात वाढ झाली आहे. जानेवारीमध्ये नवीन माल येण्यास सुरुवात झाल्यानंतर बाजरीच्या दरात घसरण होईल, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम