कांद्याचे भाव गडगडले

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १९ नोव्हेंबर २०२२ | एपीएमसीत कांद्याची आवक सुरू असून उठाव नसल्याने भाव गडगडले आहे. बाजारात ३० ते ३५ रुपयांनी उपलब्ध असलेला जुना कांदा आता २५ व २८ रुपयांनी विक्री होत आहे. तर २० ते २२ रुपयांनी विकला जाणारा नवीन कांद्याचे दर १५ ते २० रुपयांनी कमी झाले आहेत. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये एपीएमसीत नवीन कांद्याची आवक होते. सध्या नवीन कांद्याच्या २ ते ३ गाडी दाखल होत असल्‍या तरी जुना कांदा बाजारात दाखल होत आहे. बुधवारी एपीएमसीत १०० गाड्यांची आवक झाली. पुणे, नाशिक, नगरमधून कांदा दाखल झाला आहे, तुलनेने उठाव नसल्‍याने दरात मोठी घसरण झाली आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम