कांद्याच्या दरात वाढ

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २८ नोव्हेंबर २०२२ I कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. मित्रांनो कांद्याच्या बाजार भावात आज मोठी वाढ झाली आहे. आज कांद्याला तब्बल तीन हजार ५०० रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पाहायला मिळत आहेत.

कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना अच्छे दिन आले आहेत असे म्हणायला काही हरकत नाही. मित्रांनो आज झालेले लिलावात अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला तीन हजार ५०० रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल भाव मिळाला आहे. आज अहमदनगर मध्ये कांद्याची आवक वाढली होती तरीदेखील कांद्याच्या बाजारभावात वाढ झाली आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम