चालू वीजबिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांची वीज कापण्याचे आदेश

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २८ नोव्हेंबर २०२२ I सध्या राज्यात शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची पिके जळून जात आहेत. यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. आता महावितरणचे कार्यकारी संचालक विजय सिंघल यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

ते म्हणाले, महावितरणची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे वसुलीशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट करीत चालू बिल (Electricity Bill) न भरणाऱ्या शेतकऱ्यांचे वीजजोड कापावेत, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

यामुळे आता शेतकऱ्यांचे टेन्शन अजूनच वाढणार आहे. कंपनीची आर्थिक स्थिती अतिशय हलाखीची आहे. कंपनीवर प्रचंड कर्ज झाले आहे. नवीन कायद्यांमुळे कर्ज घेण्याची क्षमताही कमी झाली आहे, असे यावेळी सांगण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम