हरभरा पिकातील घाटेअळीचे एकात्मिक व्यवस्थापन

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ७ नोव्हेंबर २०२२ |हरभरा हे रब्बी हंगामातील प्रमुख डाळवर्गीय पीक असून, विविध रोग व किडींमुळे हरभन्याचे उत्पादन कमी मिळते. हरभ-यावरील घाटेअळीपासून पिकाचे ३० ते ४० टक्के नुकसान होते. हे टाळण्यासाठी शेतक-यांनी जागरूक राहून किडींची ओळख करून पीक संरक्षण खर्चात बचत करण्यासाठी एकात्मिक किड व्यवस्थापनाचा वापर करावा.ही अळी अमेरीकन बोंड अळी, हिरवी बोंड अळी, हरभऱ्यावरील घाटे अळी व तुरीवरील शेंगा पोखरणारी अळी अशा विविध नावांनी ओळखली जाते. पूर्ण विकसित घाटे अळी पोपटी रंगाची (यात विविध रंगछटा सुद्धा आढळतात) व शरीराच्या बाजूवर तुटक करड्या रेषा आढळतात.

 

नुकसान :
लहान अळ्या सुरवातीस पानावरील आवरण खरडून खातात. अशी पाने काही अंशी जाळीदार व भुरकट पांढरी पडलेली दिसतात. विकसित घाटे अळी कळ्या व फुले कुरतडून खातात. पूर्ण वाढ झालेली अवस्था तोंडाकडील भाग घाट्यात घालून आतील दाणे फस्त करते.

घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रण :

उन्हाळ्यात जमिनीची नांगरणी करावी. त्यामुळे किडींचे कोष पक्षी वेचून खातात, तसेच उन्हामुळे मरतात.
वाणनिहाय शिफारशीत अंतरावर पेरणी करावी.
घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी सापळ्यामध्ये ल्युरचा वापर करावा. शेतात हेक्‍टरी ५ सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत ३ दिवस आर्थिक नुकसान मर्यादेपेक्षा जास्त (८-१० प्रती सापळा) आढळल्यास त्वरित उपाययोजना करावी.
शेतात दरहेक्‍टरी २० पक्षीथांबे उभारावेत. पक्ष्यांमुळे अळ्यांची संख्या कमी होण्यास मदत होते.
घाटे अळीने आर्थिक नुकसानीची पातळी (१-२ अळ्या प्रती मीटर ओळ किंवा ५ टक्के किडग्रस्त घाटे) पार केल्यास व्यवस्थापन उपाययोजना करावी.
वनस्पतिजन्य कीटकनाशके :सुरवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी फायदेशीर आढळून आली आहे.

 

जैविक व्यवस्थापन :

घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाचा वापर शिफारसीनुसार करावा. प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्यांचे नियंत्रण करावे.

 

रासायनिक नियंत्रण :

हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसानीच्या संकेत पातळीवरील प्रभावी व्यवस्थापनासाठी खालील कोणत्याही एका कीटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून साध्या (नॅपसॅक) पंपाने फवारणी करावी. पावर पंपाने फवारणी करायची असल्यास कीटकनाशकांचे प्रमाण तिप्पट करावे. आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी.

क्रेिनॉलफॉस २० टक्के प्रवाही २० मिलिं.
इमामेक्टिन बेंझोएट ५ टक्के ३ ग्रॅम
डेल्टामेश्रीन २.८ टक्के प्रवाही १० मिलेि.
लॅमडा साथहॅलोमेश्रीन ५ टक्के प्रचाही १० मिलेि.
क्लोरेंट्रेनिलीप्रोल १८.५ टक्के प्रवाही २.५ मिलि

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम