कृषी सेवक | ७ नोव्हेंबर २०२२ | आंतरराष्ट्रीय बाजारात तेलबिया पेंडेच्या दरात सुधारणा झाली. तसेच देशातही सोयापेंडेचे दर वाढले. त्याचा आधार सरकीपेंडेलाही मिळतोय. देशातील बाजारात सप्टेंबर महिन्याच्या शेवटी सरकीपेंडेच्या दराने मार्च २०२१ नंतरची सर्वात खालची पातळी गाठली होती. १ सप्टेंबरला सरकीपेंडेचा भाव २ हजार २३७ रुपये प्रतिक्विंटलवर होता. मात्र त्यानंतर त्यात काहीशी सुधारणा होत गेली. ३ नोव्हेंबरला सरकीपेंड २ हजार ५६२ रुपयाने विकली गेली. त्यात पुन्हा वाढ होऊन दरानं आता २ हजार ६३९ रुपयांचा टप्पा गाठलाय. सरकी पेंडेच्या दरात सुधारणा झाल्याने सरकीचेही दर वाढले आहेत .
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम