श्रीरामपूर बाजार समितीच्या प्रशासक नियुक्तीला अंतरिम स्थगिती

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १३ नोव्हेंबर २०२२ | श्रीरामपूर बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुदतवाढीसाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार संचालक मंडळ सहा महिन्यासाठी पुढे कायम ठेवायचे की काय करायचे. प्रशासक नेमणुकीच्या निर्णयासाठी १५ दिवसांची मुदत मिळाली होती. परंतु मुदत संपूनही निर्णय न झाल्याने अखेर आज येथील बाजार समितीवर प्रशासकाच्या नेमणुकीचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिल्याची माहिती सचिव किशोर काळे यांनी दिली. सदर माहिती मिळताच सत्ताधारी गटाने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेत प्रशासक नियुक्तीला अंतरिम स्थगिती मिळविली.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम