अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा सोमवारी समारोप -शैलेंद्र चव्हाण

बातमी शेअर करा

खान्देशातील हजारो शेतकऱ्यांच्या भेटीमुळे विक्रमी प्रतिसाद

कृषी सेवक | १३ नोव्हेंबर २०२२ | शहरातील एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेजच्या मैदानावर अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे 11 ते 14 नोव्हेंबर दरम्यान भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या तीनच दिवसात खानदेशातून 80 हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी प्रदर्शनास भेटी दिल्या. या चार दिवसीय कृषी प्रदर्शनाचा उद्या (सोमवारी) समारोप होत असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ॲग्रोवर्ल्डचे संचालक शैलेंद्र चव्हाण यांनी केले.

मजूर समस्येला पर्याय व करार शेतीचे स्टॉल्स ठरले आकर्षण :-
मजूर समस्येला पर्यायी पिके तसेच यंत्र व अवजारांचे स्वतंत्र दालन, शाश्वत उत्पन्नासाठी फळभाज्या – भाजीपाला, बांबू, सुबाभूळ याच्या करार शेतीची माहिती देणाऱ्या कंपन्यांशी थेट संवाद साधण्याची संधी, कमी पाण्यात अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांबाबत सखोल मार्गदर्शन, वन्य प्राण्यांपासून संरक्षण देणारे झटका मशीन, राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांची तसेच बँक कर्जाबद्दल माहिती, दूध काढणी यंत्र, कमी श्रमात, कमी पाण्यात, शाश्वत उत्पादन देणार्‍या अपारंपरिक पिकांचेही स्टॉल्स प्रमुख आकर्षण ठरले. चार एकरवरील या कृषी प्रदर्शनात 250 हून अधिक स्टॉल्स असून प्रदर्शन सर्वांसाठी मोफत आहे.

पालकमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा सन्मान :

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले शेतकरी, कृषी उद्योजक, अधिकारी व शास्त्रज्ञ यांचा सत्कार झाला. सत्कारार्थी पुढील प्रमाणे –

सुनिल नंदुरबारे (शिंगाईत ता. जामनेर), प्रशांत पाटील (सावखेडा), डॉ. अनुप पाटील (अजनाड ता. रावेर), महेंद्र पाटील (भोरस ता. चाळीसगाव), प्रताप पाटील (मु. लोणे पो. भोणे ता. अमळनेर), शशांक पाटील (तांदलवाडी ता. रावेर), बहिणाबाई शेतकरी गट (कोंढावळ), सहारा कापूस गट (सोनाळे ता. जामनेर), भगवान पाटील (लोणी ता. पारोळा), देविदास शिंदे (औरंगाबाद), दीपक परदेशी (भरारी फाउंडेशन), संजय पवार (पोकरा, जळगाव), डॉ. विक्रांत भालेराव (शास्त्रज्ञ, धुळे), अंजली चव्हाण (नगरदेवळा ता. पाचोरा), अभिलाष नागला (अंजाळे, ता. यावल), संदीप माळी व उमेश सोनार (रमोरफळ ता. पारोळा), बसवंत मधमाशी उद्यान (पिंपळगाव (ब.), जि. नाशिक), पांडुरंग बोधले (धरतीधन ॲग्रो सेल्स जळगाव), ललित लोढाया (महावीर कृषी सेवा केंद्र, जळगाव), मनोज पाटील (नांद्रा बुद्रुक ता. जि. जळगाव), राजेंद्र चव्हाण (कानळदा ता. जि. जळगाव), विनोद परदेशी (गणेश नर्सरी, चाळीसगाव), अविनाश पाटील (गांधलीकर अँग्रोटेक, संचालक), मधुकर गवळी (संस्थापक, ओम गायत्री समूह)

जैन इरिगेशन सिस्टिम लिमीटेड या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असून प्लॅन्टो कृषी तंत्र, श्रीराम ठिबक, के. बी. एक्स्पोर्ट, ओम गायत्री नर्सरी, निर्मल सीड्स, पूर्वा केमटेक, नमो बायोप्लांट्स, ग्रीन ड्रॉप, सिका ई- मोटर्स, आर. सी. बाफना ज्वेलर्स हे सहप्रायोजक आहेत.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम