महाराष्ट्र कधी झुकला नाही झुकणारही नाही – छगन भुजबळ

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २९ ऑक्टोबर २०२२ | महाराष्ट्र कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र महाराष्ट्र कमकुवत होणार नाही. दिल्लीला देखील आधार देण्याचं काम महाराष्ट्र करतो हे कुणीही विसरू नये अशी टीका करत महाराष्ट्र कधी झुकला नाही झुकणारही नाही. दिवस येतात आणि दिवस जातात जरा धीर धरा आपले दिवस परत येतील असा सबुरीचा सल्ला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा आमदार छगन भुजबळ यांनी शेतकरी मेळाव्याप्रसंगी उपस्थितांना दिला. काकासाहेब नगर, रानवड येथे स्व.अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था पिंपळगाव बसवंत, संचलित कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याचा ४० वा गळीत हंगाम शुभारंभ भुजबळ यांच्या हस्ते पार पडला. यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

.पुढे ते म्हणाले की, निफाडमधील कारखाने सुरू करण्यासाठी आमदार दिलीप बनकर यांनी सातत्याने प्रयत्न केले असून शरद पवार व अजित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे रानवड कारखाना सुरू झाला. यावेळी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर, डॉ.सुधीर तांबे, नरेंद्र दराडे, हिरामण खोसकर ,नितीन पवार, सुहास कांदे, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते,श्रीराम शेटे, मविप्रचे सरचिटणीस ऍड.नितीन ठाकरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, के.के.वाघ संस्थेचे अजिंक्य वाघ, माणिकराव बोरस्ते, चांगदेवराव होळकर, सुरेशबाबा पाटील, राजेंद्र डोखळे, नानासाहेब महाले, हंसराज वडघुले, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

 

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम