स्ट्रॉबेरीचा हंगाम लांबणीवर

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २९ ऑक्टोबर २०२२ | . यंदा, मात्र पाऊस लांबल्याने पाचगणी आणि महाबळेश्वरमध्ये काही ठिकाणीच स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात आली असल्याने यंदा हंगाम महिनाभर उशिराने सुरू होणार असल्याचे संकेत व्यापाऱ्यांनी दिले

आहेत.ऑक्टोबर अखेर आणि नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला स्ट्रॉबेरीचा हंगाम सुरू होतो स्ट्रॉबेरी हे थंडीत पिकणारे फळ असल्याने त्याचा मुख्य बहर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्यात असतो. हा बहर जून महिन्यापर्यंत सुरू राहतो. डिसेंबर, जानेवारी महिन्यात सर्वाधिक स्ट्रॉबेरी बाजारात विक्रीसाठी दाखल होत असून ऑक्टोबरअखेर नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला वाशीच्या एपीएमसी बाजारात स्ट्रॉबेरी दाखल होण्यास सुरुवात होते. सध्या बाजारात स्ट्रॅाबेरीचे फक्त ५० बॉक्स दाखल होत आहेत. अशातच यंदा पाऊस लांबल्याने उशिरा लागवड झाली आहे; तर आधी लागवड केलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने स्ट्रॅाबेरी उशिरा दाखल होणार आहे.

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम