चहार्डी येथील तीन शेतकऱ्यांचे कापसासह इतर साहित्य लांबवीले

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २ नोव्हेंबर २०२२ | चोपडा तालुक्यातील चहार्डी शिवारातून तीन शेतकऱ्यांच्या शेतातून ५ क्विंटल कापूस ठिबक सिंचनच्या नळ्या, पाण्याची मोटर आणि पाण्याची मशीन असा एकूण ५३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आज्ञात चोरट्यांनी चोरून केला आहे. याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोपडा तालुक्यातील चहार्डी रहिवासी वंदना कैलास पाटील तसेच हर्षल प्रकाश पाटील आणि रवींद्र रमेश पाटील यांच्या शेतातून अज्ञात चोरट्यांनी २० नोव्हेंबर ते ३१ नोव्हेंबर दरम्यान ५ क्विंटल कापूस, १३ ठिबक सिंचन नळ्यांचे बंडल, १० हजार रुपये किंमतीची पाण्याची जलपरी आणि पाण्याची मशीन असा एकूण ५३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल शेतातून चोरून येण्याचे समोर आले. या संदर्भात तीनही शेतकऱ्यांनी चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस नाईक मधुकर पवार करीत आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम