कृषी सेवक | १४ नोव्हेंबर २०२२ | ‘2025 पर्यंत सर्वांसाठी ऊर्जा’ या संकल्पनेतून उदयास आलेली कुसुम सोलार योजना देशभरात सुरू करण्यात आली होती. सर्व गरजू शेतकर्यांना सौर ऊर्जा असायला पाहिजे हे कुसुम सोलार योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. ही योजना महाराष्ट्र राज्यात दिनांक ८ मार्च २०१९ पासून महाराष्ट्रात सुरू करण्यात आली होती.
कुसुम सोलार योजना ठळक वैशिष्ट्ये:
• पासून ८ मार्च २०१९ राज्यात कुसुम सोलार योजना – ग्रामीण राबविण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत.
• यापूर्वी सुरू मुख्यमंत्री सौर पंप योजनेचे रूपांतर कुसुम सोलार योजनेमध्ये करण्यात आलेले आहे.
• योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज केल्यानंतर प्रथम अर्ज करणार त्याला प्राधान्य देण्यात येते.
• पात्र ठरलेल्या शेतकर्यांना मंजूर कोठयामधून लाभार्थ्यांना सोलार सौर ऊर्जा पंप वाटप केले जाते शेतकरी वाटा फक्त ५ टक्के तर बाकी अनुदान देण्यात येते.
• कोसुम सोलार योजनेअंतर्गत वीज नसलेल्या शेतकर्यांना ३ HP पंप साठी १६००० रुपये तर ५ HP पंप साठी २४००० भरावे लागतात.
महाराष्ट्र कुसुम सोलार योजना पात्रता:
• वीज कनेक्शन नसलेले शेतकरी.
• १ हेक्टर पर्यन्त ३ एचपी सौर पंप.
• २ हेक्टर पर्यन्त ५ एचपी सौर पंप
• २ हेक्टर पेक्षा जास्त ७.५ एचपी सौर पंप.
कुसुम सोलार योजना कागदपत्रे:
महारष्ट्र कुसुम सोलार योजना २०२२ योजनेचा (कुसुम सोलार योजना – ग्रामीण) लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्जासाठी लाभार्थ्यांनी कुसुम सोलार अर्जासॊबत खालीलप्रमाणे कागदपत्रे जोडणे आवश्यक असते.
१) जमिनीचा ७/१२ आणि ८ अ उतारा
२) बँक पासबूक
३) आधार कार्ड
४) पासपोर्ट फोटो
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम