भारतात डाळींब लागवडीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ३ नोव्हेंबर २०२२ | डाळींब हे मध्यपूर्वेकडील देशातील फळझाड आहे. पण त्याचा प्रसार आता जगातील बर्‍याच देशातून झाला आहे. भारतात डाळींब लागवडीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. अधिक उत्पादन देणार्‍या मस्कत, गणेश व जी – १३७, आरक्त्त, मृदुल, शेंदरी जातींना बाजारात वाढती मागणी आहे, त्यामुळे डाळींबाचे क्षेत्र महाराष्ट्रात २५ हजार हेक्टरपेक्षा जास्त वाढलेले आहे. हे फळझाड अत्यंत काटक व पाण्याचा ताण सहन करणारे आहे. त्यामुळे हे फळझाड विविध प्रकारच्या जमिनी व हवामान यांना यशस्वीपणे तोंड देवू शकते. डाळींबाला सर्व हंगामात फुले येतात. त्यामुळे याचा कोणताही भार घरता येतो. यामुळे हे फळझाड विविध प्रकारच्या जमिनी व हवामान यांना यशस्वीपणे तोंड देवू शकते. डाळींबाला सर्व हंगामात फुले येतात. त्यामुळे याचा कोणताही बहार धरता येतो. यामुळे डाळींब हे फळ बाजारात वर्षभर उपलब्ध असते. डाळींबाच्या अनेक जाती असल्या तरी गणेश या जातींची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर केली जाते. ढोकला (गुजरात), ज्योती (कर्नाटक), जोधपूर रेड व जालोर सिडलेस (राजस्थान) या जातीही भारताच्या इतर भागात लावल्या जातात. डाळींब हे एक बहुगुणी फळ आहे. डाळींब फळामध्ये ७८% पाणी, १.९ प्रथीने, १.७% स्निग्ध पदार्थ, १५% साखर व ०.७% खनिजे असतात. याशिवाय केल्शियम १०, फॉस्फरस ७०, लोह ०.३०, मॅग्नेशियम १२, सोडियम ४ व पोटॅशियम १७ मि.ग्रॅ./१००ग्रॅम इतकी खनिजे असतात. तसेच थायमीन ०.०६, रिबोफ्लेवीन ०.१, नियासीन ०.३ व क जीवनसत्त्वे असतात. डाळींबाच्या फळामध्ये सरासरी ६० ते ६७ टक्के दाणे निघतात. पूर्ण पिकलेल्या डाळींबात ४५ ते ६०% रस निघतो व डाळींबाच्या दाण्यापासून ७६ ते ८५% रस निघतो. आजपर्यंत डाळींब प्रामुख्याने जेवणानंतर मुखशुद्धीसाठी किंवा खाण्यासाठी वापरले. जात असे परंतु आता डाळींबापासून अनेक उत्तम, चवदार पौष्टीक पदार्थ तयार करता येतात असे संशोधनावरून आढळून आले आहे.

paid add
बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम