महाराष्ट्र मान्सून अपडेट: मान्सून २४ तासांत कोकण व मध्य महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नगर, बीडपासून डहाणू, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पर्यंत पोहोचला आहे.
राज्यातील बहुतांश भागात मान्सून दाखल झाला असून आता अरबी समुद्र शाखाच कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढे जात आहे. बंगाल उपसागर शाखा अजूनही स्थिर असल्यामुळे मान्सून विदर्भ आणि मराठवाड्यात वेगाने सरकण्यास अडचण जाणवत आहे. तसेच, मान्सून नाशिकमध्ये पोहोचल्याची माहिती निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
मान्सून आज कुठपर्यंत पोहोचला?
मान्सून २४ तासांत कोकण व मध्य महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नगर, बीडपासून डहाणू, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पर्यंत पोहोचला आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील पाऊस स्थिती:
मुंबईसह संपूर्ण कोकणातील सात जिल्ह्यात १५ जूनपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या १० जिल्ह्यात १३ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. आज आणि उद्या खान्देशात वळीव पावसाबरोबर गारपीट होण्याचीही शक्यता आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यातील पाऊस स्थिती:
संपूर्ण विदर्भातील ११ जिल्ह्यात वळीव पूर्व मोसमी पावसाची शक्यता आहे आणि मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात १२ जूनपर्यंत मध्यम मोसमी पावसाची शक्यता आहे.
मान्सूनसाठी अनुकूल आणि प्रतिकूल वातावरणीय स्थिती:
मराठवाडा परिसरातील ९०० मीटर उंचीपर्यंतची चक्रीय वाऱ्यांची स्थिती मान्सूनसाठी पूरक आहे. परंतु, काही परिस्थिती मान्सून प्रगतीसाठी प्रतिकूल असली तरी पोहोचलेल्या ठिकाणी पाऊस पडण्यास मदत होऊ शकते.
मान्सून २१ ते २३ डिग्री अक्षवृत्तापर्यंत पोहोचला आहे. परंतु, मध्य तपांबंर पातळीतील पूर्व-पश्चिम वाऱ्यांचा शिअर झोन १८ डिग्री अक्षवृत्तावर असून त्याची जाडी कमी झाली आहे. हा शिअर झोन मान्सून सीमा रेषेच्या दक्षिणेकडे आहे. मान्सून डहाणू, नाशिक, छत्रपती संभाजीनगर पूर्व-पश्चिम रेषेपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे पाहूया, मान्सून किती पाऊस देतो आणि खान्देश, विदर्भ आणि उर्वरित मराठवाड्यात कधी पोहोचतो.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम