कृषी सेवक I ३ डिसेंबर २०२२ I केंद्र सरकारने रेशनिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल केला असून, त्याचा फायदा करोडो लोकांना होणार आहे. देशभरात मोफत रेशन देण्याच्या सुविधेसोबतच सरकारने पोर्टेबल रेशन कार्डची सुविधाही सुरू केली आहे. ही सुविधा नुकतीच अनेक राज्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे, मात्र लवकरच ती देशभरात सुरू करण्याची योजना आहे.
जुन्या कार्डवरच सुविधा उपलब्ध
पोर्टेबल रेशन कार्डची सुविधा लागू झाल्यानंतर तुम्हाला देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात रेशनची सुविधा सहज मिळेल. यासाठी तुम्हाला वेगळे कार्ड बनवावे लागणार नाही. यासोबतच तुम्हाला तुमच्या जुन्या शिधापत्रिकेवरच सुविधेचा लाभ मिळेल.
डिसेंबरपर्यंत मोफत रेशन मिळेल
केंद्र सरकारकडून डिसेंबरपर्यंत मोफत रेशनची सुविधा दिली जात आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत, सरकार पात्र लाभार्थ्यांना महिन्यातून दोनदा रेशन कोटा देत आहे, ज्यामुळे देशातील कोट्यवधी लोकांना फायदा होत आहे. एकदा रेशनचे वितरण निश्चित किंमतीवर केले जाते. तर दुसऱ्यांदा गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मोफत वाटप करण्यात आले आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम