कापसाच्या दरवाढीची शक्यता

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ३ डिसेंबर २०२२ I कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कापसाच्या दरात प्रति क्विंटल २०० ते ३०० रूपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्यामुळे तेथील सरकारने कडक निर्बंध लादले होते.

 

त्यामुळे अर्थकारणावर विपरित परिणाम झाला. त्यामुळे चीनकडून कापसाची मागणी मंदावली होती. परंतु सरकारच्या निर्बंधांविरोधात चीनमधील जनता रस्त्यावर उतरली. अनेक ठिकाणी निदर्शने झाल्यानंतर चीन सरकारने काहीशी नरमाईची भूमिका घेतली आहे.

 

नागरिकांमधील वाढत्या रोषामुळे ग्वांगझू आणि चोंगकिंग या शहरांमधील निर्बंध सरकारने शिथिल केले आहेत. चीन सरकार इतरही शहरांमधील कोरोना निर्बंध शिथिल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे चीनकडून कापसाची मागणी वाढण्याची चिन्हे आहेत. त्याचा परिणाम म्हणून भारतातील कापसाला उठाव मिळू शकतो. त्यामुळे येत्या काही दिवसांत कापसाचे भाव प्रति क्विंटल २०० ते ३०० रूपये वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी बाजारातील भावपातळीवर नजर ठेऊन टप्प्याटप्प्याने कापूस विकावा, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम